थेंबाला इंग्रजी मध्ये drop म्हणतात. ही एक अतिशय complicated language आहे. आता थेंब पडला हे इंग्रजीत मध्ये कसे म्हननार ? (drop drop?? or drop fall ??) actually my english is very poor. I know only drop in the sea named english. पण थेंबे थेंबे तळ सचे अशी म्हण आहे मराठीत. च्यायला मराठीची धाव तळयापर्यंतच. कारण हिंदी मधे 'बूंद बूंद से बनता है सागर' अस काहीतरी म्हणतात असो ........
थेंबाला मोठा इतिहास आहे. इतिहासाची पाने उघडून पाहिल्यावर आपल्या लक्षात येइल की खुप ठिकाणी त्याचा उल्लेख येतो. जसे बीरबल आणि बादशाहची गोष्ट 'बूंदसे गई सो हौद से नहीं आती' म्हणजेच काय तर इथे थेंब हा एक बादशाहच्या एभ्रतीचे प्रतिक होऊन आपल्या समोर येतो. तो थेंब अत्तराचा असतो गोष्ट अलहिदा. असो ....
इतिहासातील काही मुनि थेंब शिंपडून माणसाचे कुत्रे हरिन वगैरे बनाविन्याचे experiment करीत. पौराणिक कथांमध्येही थेंबाचा उल्लेख आवर्जून केला आहे. हनुमानाच्या घामाच्या थेंबातून 'मकरध्वजाचा' जन्म , समुद्रमंथानातून आलेले अमृत घेऊन जात असताना पडलेले थेंब, शिवाजी महाराजानी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलेला रक्ताचा थेंब एक ना अनेक.
इतिहासातील थेंबांचे महत्व बघता त्याचा समावेश इतर विषयांत पण होऊ लागला भूगोलात सौर चक्र ची आकृति. मोठ्या लोकांच्या science मधे एक थेंबात किती शुक्रजंतु ??? etc. मराठी कवींनी थेंबावर कविता लिहिल्या आहेत . काहींनी चारोळ्या ...
पावसाचा एक थेंब चुकून
माझ्या खोलीत येउन पडला
आणि आतला पाऊस बघून
मुक्यानेच रडला
थेंब रडतो म्हणजे काय ? थेंबालापण अश्रु असतात . Philosophy मध्ये पण म्हणतात ना 'पाण्याचा थेंब तव्यावर पडला की त्याची वाफ होते आणि शिंपल्यात पडला की मोती ' साथ महत्वाची . पाण्याच्या थेंबावर यात अन्याय झाला आहे की राव . शिंपल्याला म्हणा बर पाण्याच्या थेंबाशिवाय मोती बनव म्हणून ......... त्याच्या बापाला (शंख) पण शक्य होणार नाही.
आता थोड emotion कड़े बघू (थेंबभर) . 'कुठलीही भावना ही थेंबाने व्यक्त होते' हे या शतकातील महत्वाचे वाक्य आहे . Thanks to Jayant. मी पुरावे देऊ शकतो आनंद झाला की आनंदाश्रु , दुःख झाले की फ़क्त अश्रु, राग आला भीती वाटली की घामाचे थेंब आणि छेड़छाड़ करायची असेल तर आंघोळ केल्यावर किचन मधे जाउन ओल्या केसांतून उड़वलेले थेंब ( आपली बायको किचन मधे आहे हे लक्षात घ्या ........... कामवाली नाही ). एवढच काय तर प्यायला बसलेले मित्र जे मित्र बरोबर नाही त्यांच्या नावाने उड़वता ते ४ थेंब.
थेंबानी ढग बनतात थेंबानी सागर. आयुष्याची सुरुवात थेंबानी होते आयुष्यभर ह्या ना त्या कारणाने आपला त्याच्याशी संबंध येतो . 'दो बूंद जिंदगी की ' असे अमिताभ पण म्हणतो. रक्तदान शिबिरात पण जाहिरातीदाखल दाखवला जातो तो रक्ताचा थेंब. मरणाच्या जवळ असलेला माणूस पण बघत असतो तो काशी मधून आणलेला पाण्याचा थेंब . आयुष्यभर साथ करतो तो आहे थेंब. तो कोणाच्या डोळ्यातून बाहेर पडला जेव्हा आपण हे जग सोडून जातो तरच आपल्या आयुष्याला अर्थ असतो.
जयंत
Kadak
ReplyDeleteGood one....
ReplyDeleteDada, Ek Number :) :)
ReplyDeleteChan lihilay !!!
ReplyDeleteTuza ha ek post ek themb ahe. Ani ashe barech themb milun ek Sea banel yaat shanka nahi. Keep writing.
अप्रतिम!
ReplyDeleteमार्लीश भाषेत संवाद साधणे अंगवळणी पडलय हे समजू शकतो,पण तरीही इंग्रजाळलेले मराठी नसते वापरले तर 'श्रीं'ना आनंद झाला असता.
Barech bhav chan tiplet Raje, Shabbas!
ReplyDeletefarach chhan... thembachi vyapti farach chhan mandaliy... samudrakade baghatana aapan kayam thembala visarato.... pan themba thembanich samudra banalela asato he tevha aapan visarat asato....
ReplyDeleteथेंबाचा एवढा चांगला उपयोग फक्ता जयंत च करू शकतो .. :)
ReplyDeleteखरच अप्रतिम ...
ReplyDeleteथेंबा वर PHD करण्याचा विचार आहेस वाटत...
सुंदर रचना केली आहेस
EK NUMBER
ReplyDelete